Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report

आता जावूयात संसदेत.. जिथं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.. खरंतर आज दुपारपर्यंत हे अधिवेशन फक्त गोंधळामुळेच चर्चेत होतं.. पण आज दुपारी वादांची कोंडी फोडण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं. खरंतर, त्यात विरोधकांचीही भूमिका तितकीच महत्वाची ठरते.. पण, राहुल गांधींच्या भाषणावरुन निर्माण झालेला संघर्ष आजपुरता जरी शांत झाला असला तर तिढा कायम आहे... अधिवेशनात आज नेमकं काय घडलं पाहुयात
१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला..
त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून
अर्थसंकल्पावर चर्चा होणं अपेक्षित होतं.
पण, विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या भाषणावेळी...
देशभक्तीच्या मुद्द्यावरुन शाब्दिक चकमक उडली..
तेव्हापासून आज दुपारी दोन वाजेपर्यंत...
लोकसभेत फक्त आणि फक्त गोंधळचं दिसला...
बरं, ४ फेब्रुवारीला याच प्रकरणात दुसरा अंक सुरु झाला..
त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार होते..
पण पाच वाजताच सभागृहात काँग्रेससह विरोधकांचा गोंधळ सुरु झाला
पाच वाजून दहा मिनिटांनी काँग्रेसच्या महिला खासदार आक्रमक झाल्या...
आणि त्या पंतप्रधान जिथं बसतात त्या आसनाजवळ पोहोचल्या...
त्यांच्या हातात बॅनर्स होते आणि मोदींविरोधात घोषणा सुरु होत्या..
नेमकं याचाच आधार घेत दुसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांनी एक मोठं विधान केलं..