Pune Wada Redevelopment Issues : शनिवार वाड्याजवळच्या 300 वाड्यांचे काय होणार? Special Report
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे Updated at: 06 Apr 2023 01:27 PM (IST)
पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पुण्याची शान असलेला शनिवार वाडा...... त्यात पोटनिवडणुकांमुळे संपुर्ण राज्याचं लक्ष याच भागातल्या राजकीय रणधुमाळीकडे होतं. पण शनिवार वाड्याजवळ राहणाऱ्यांसमोर मात्र या वाड्यामुळेच वेगळे प्रश्न निर्माण झालेयत. शनिवार वाड्यापासून शंभर मीटर अंतरावर कोणतंही नवीन बांधकाम करण्यास केंद्रीय पुरातत्व खात्याकडून मनाई आहे . त्यामुळे शनिवार वाड्याच्या परिसरातील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक बनलेल्या तीनशे वाड्यांचं करायचं काय हा प्रश्न आता पडलाय. यावरुन आता थेट पंतप्रधान मोदींनाच साकडं घातलं जातंय... नेमक्या अडचणी काय आहेत पाहुयात....