Pune Visarjan : मिरवणुका लांबणाऱ्या?ताण वाढवणाऱ्या?पुण्यातील मिरवणुकांबद्दल काय ठरलंय?Special Report
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका ही एक पर्वणीच असते. मानाचे बाप्पा वाजत-गाजत पुढे पुढे सरकत असताना, असंख्य भाविकांची मांदियाळी निरोप देण्यासाठी उपस्थित असते... या काळात पोलीसही चोख बंदोबस्त ठेवतात... यंदा मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येतायत. त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन पुणे पोलिसांसमोर असणार आहे. पाहूयात, पुण्यातील विसर्जन मिरवणुकांबद्दल नेमकं काय ठरलंय?