Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
एकिकडे पुणे पदवीधरची जागा भाजपाला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधली अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. थेट नाही पण अप्रत्यक्ष रित्या पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारण्यात येत आहेत तर दुसरीकडे पुणे शिक्षक मतदार संघामध्ये मात्र शिंदेच्या शिवसेनेन भाजपाशी दोन हात करण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या भूमिका योग्य की एकनाथ शिंदेचा निर्णय योग्य अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाने उमेदवार उभा केला आहे. पुणे पदवीधर ही राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची जागा मात्र महायुतीतल्या वाटाघाटीत ही जागा गमवावी लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून खंत व्यक्त करण्यात येते हे सामूहिक अपयश असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मान्य केले मात्र जागावाटपाच्या वाटाघाटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या झाल्याचं सांगायला तटकरे विसरले नाहीत त्यामुळे सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलाय का या प्रश्नाची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. जागा आमची हक्काची होती मिळाली नाही वस्तुस्थिती खरी आहे जेव्हा आम्ही कमी पडलो नक्कीच आहोत आमचं हे सामूहिक अपयश आहे असं मानलं पाहिजे जागा मिळणं गरजेची होतीच कारण ही जागा पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री लाड हे त्या ठिकाणी निर्वाचित झालेले होते ठीक आहे अखेरच्या टप्प्यात लाड इकडे तिकडे गेले तरी मतदान शेवटी हे पक्षाचं होतं आणि त्याच्यामुळे ते आम्हाला मिळायला पाहिजे होते असं आमचा आग्रह त्या ठिकाणी निश्चित होता विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खरं तर हक्काच्या दोन जागा आहेत ज्या ठिकाणाहून सध्या स्टॅन्डिंग एम एल ए हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते पुणे पदवीधर मध्ये अरुण लाड तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण त्या ठिकाणाहून आमदार होते महायुतीच्या जागा वाटपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केवळ एकच जागा वाट्याला आलेली आहे महायुतीतील सर्वात प्रबळ पक्ष म्हणून भाजपाने आपल्याकडे तीन जागा ठेवल्या असून याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्काची असणारी पुणे पदवीधरची जागा पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा आणि नागपूर पदवीधरची जागा देखील आपल्याकडे ठेवली आहे भाजपाने हक्काची जागा हिसकावली अशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची तक्रार असताना कृषी मंत्री दत्ता भरಣೆ यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे भाजपाने राष्ट्रवादीकडून पुणे पदवीधरची जागा हिसकावली नाही असं त्यांचं म्हणणं आहे मात्र अजित पवार हयात असते तर चित्र थोडसं वेगळं असतं असं कृषी मंत्र्यांना वाटतंय असं हिसकावून घेणं म्हणण्यात अर्थ नाही कारण जे आमच्या बाजूने लाड साहेब हा निवडून आले होते तेच त्यांनीच भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे ते ऑटोमॅटिकच जागा ती भाजपाच्या वाट्याला गेली ती जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यामुळे शिव ही फॉर्म्युला प्रमाणे ती भाजपालाच मिळाली आहे अजित दादा 100% दादा दादाच होते ठीक आहे दादा असते तर अजून आमच्या मागणीला थोडा जोर जास्त राहिला असता