Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

abp majha web team  |  04 Oct 2026 11:55 PM (IST)
ABP News

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांपासून अनेक नेते या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतायत...विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांची भाषणं, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय वक्तव्यंच चर्चेचा विषय ठरतायत...त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन आता राजकारण्यांचा आखाडा बनतंय का?
आणि या सगळ्या राजकीय गर्दीत विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न मागे पडणार नाहीत ना...?


एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं...


पण आता या आंदोलनाला तीन वेगवेगळे गट आणि तीन वेगवेगळी ठिकाणं मिळाली आहेत...


एक आंदोलन आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात...


तर दुसरं आंदोलन शास्त्री रस्त्यावरील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर...


आणि तिसरं आंदोलन अलका टॉकीज चौकात सुरू आहे...


तिन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत...


तीन आंदोलनं असली तर मात्र एक गोष्ट समान आहे...


ती म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणारे राजकीय नेते!


रोहित पवारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या 


आंदोलनातील विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे, एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा...


त्याचबरोबर परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात यावी..


इथं आंदोलन सुरु झाल्यापासून..


महाराष्ट्र काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी हजेरी लावलीय..


हर्षवर्धन सपकाळांनी तर राहुल गांधींनी केलेलं ट्विटही विद्यार्थ्यांना वाचून दाखवलं..


फक्त काँग्रेसचेच नाही तर ठाकरेंचेही नेते इथं गर्दी करतायेत..


आता दुसरं आंदोलन.. 


तर शास्त्री रस्त्यावरील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर सुरू असलेल्या 


आंदोलनातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीनेच घ्यावी... हीच प्रमुख मागणी..


जिथं आतापर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप


यांच्यासह आज आमदार नितेश राणे यांनीही हजेरी लावली...


आता तिसरं आंदोलन...


तर अलका टॉकीज चौकात सुरू असलेल्या तिसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांची भूमिका मात्र, वेगळी आहे...


त्यांना परीक्षा बहुपर्यायी नको तर विस्तृत पद्धतीनं घेण्यात यावी..


अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे...


मात्र विद्यार्थ्यांच्या या वेगवेगळ्या मागण्यांपेक्षा आता चर्चेत आहेत...


आंदोलनाला भेट देणारे राजकीय नेते आणि त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोप!


राज्य सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतल्यानंतर 


सरकारनं आयोगाच्या सचिवांची बदली करण्यात आली...


ओषध निरीक्षक गट ब.. पदाचा पेपर फुटल्यानंतर...


प्रकरणात पोलीस चौकशी सुरु झाली.. 


काही आरोपींना अटकही करण्यात आली ..


हे सगळं करत असतानाच सरकारनं अध्यक्षांना थेट हटवता येणार नाही.. असंही स्पष्ट केलं..


पण, याच मुद्द्यावरून विरोधक सरकारवर निशाणा साधतायत...


सत्ताधारी नेत्यांनी रोहित पवार विद्यार्थ्यांच्या आड आपलं राजकारण साधतायेत..


असा आरोप केला..


आंदोलनं विद्यार्थ्यांचं.. अडचणी विद्यार्थ्यांच्या..


मागण्याही विद्यार्थ्यांच्याच.. पण, भाषणं नेत्यांची.. 


इथल्या नेत्यांच्या गर्दीमुळे आंदोलन देशपातळीवरील पोहोचलं..


मात्र या सगळ्या राजकीय गर्दीत एक प्रश्न मात्र कायम आहे...


ज्या प्रश्नांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत...तो प्रश्न सुटणार कधी?


आणि राजकीय नेत्यांच्या भाषणांच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत


विद्यार्थ्यांचा मूळ आवाज हरवणार तर नाही ना...?


याच प्रश्नाची चर्चा आता पुण्यात दबक्या आवाजात सुरू झाली आहे...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA