Pune MHADA Special Report : म्हाडा सामान्यांसाठी की बिल्डरांसाठी? म्हाडा म्हणतं, आमचा संबंधच नाही!
abp majha web team | 12 Mar 2023 07:14 PM (IST)
तुम्ही जर पुण्यात म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न बघत असाल तर पुन्हा विचार करा.. कारण वरचेवर म्हाडाची लॉटरी तर निघते, पण प्रत्यक्ष घर चार-चार वर्षं मिळत नाही. कारण ही घरं खासगी बिल्डरांची असतात. लॉटरी काढून म्हाडा ही घरं केवळ सामान्यांच्या माथी मारतं.. एककीडे बँकेचा हप्ता जातो, दुसरीकडे राहत्या घरचं भाडंही भरावंच लागतं.. सर्वात भयानकन म्हणजे म्हाडाकडे तक्रार करण्यास गेलं तर तिथले अधिकारी चक्क हात वर करतात.