Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report
abp majha web team | 04 Nov 2025 10:14 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. एका महिन्यात तीन जणांचा बळी गेल्यानंतर, वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले आहे, मात्र स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीने ते वनतारामध्ये पाठविण्याचं ठरवलेलं आहे,' अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार, पुण्यातील सुमारे १२०० बिबट्यांपैकी काही बिबटे गुजरातच्या वनतारा येथील केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहेत. मात्र, हा तोच नरभक्षक बिबट्या आहे की नाही हे स्पष्ट नसल्याने आणि सर्व बिबटे स्थलांतरित होणार का, याबद्दल ठोस पुरावा नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जेरबंद बिबट्याला ठार मारण्याची मागणी करत नाशिक-पुणे महामार्ग रोखला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन काय पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.