Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report

नसरापूरच्या असुराला, म्हणजेच आरोपी भीमराव कांबळेला कायद्यानुसार फासावर लटकवायचं असेल... तर त्याच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करावेच लागणार आहेत... आणि हे पुरावे गोळा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री एक कारवाई केलीय.. कोणती कारवाई आहे ती? आणि या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती कोणती माहिती लागलीय.. पाहुयात आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे आणि मिकी घई यांचा हा स्पेशल रिपोर्ट....
सध्या संपूर्ण महाराष्ट्राची एकच मागणी आहे...
ती म्हणजे, नसरापूरमध्ये साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या...
भीमराव कांबळे नावाच्या नराधमाला फासावर चढवण्याची
भीमराव कांबळेविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस देखील कामाला लागलेत
आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्याला गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रिक्रिएशन तयार करताना पोलिसांच्या हाती लागलेली नवीन माहिती न्यायालयात सादर केली जाण्याची शक्यता आहे...
गोठ्यातच राहत होता नसरापूरचा असूर- हेडर
ज्या गोठ्यात भीमराव कांबळेने चिमुकलीवर अत्याचार केले, त्याच गोठ्यात तो चार ते सहा दिवस मुक्कामी होता
जवळच विटा उचलण्याचं काम मिळाल्यामुळे भीमराव कांबळेने गोठ्यात स्वतःचे कपडे आणि साहित्य ठेवलं होतं.
विटा उचलण्याचं काम करताना भीमराव कांबळेची चिमुकलीवर वक्रदृष्टी पडली
ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं त्यादिवशी भीमराव कांबळे चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला.
गोठ्यात नेण्यापूर्वी भीमराव कांबळेनं पीडित मुलीला खाऊ म्हणून शेव खायला दिली