Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report

Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पुढची बातमी पुण्याच्या हडपसर मधल्या एका रुग्णालयामध्ये बुधवारी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला आणि एका संशयिताला नागपूर मधून ताब्यात घेतलं पण त्यानं हा सगळा प्रकार का केला? रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू का ठेवली? बघूया हा सविस्तर रिपोर्ट. शिवाजी राठोड पुण्यातल्या उषा किरण रुग्णालयात टाइमर बॉम्ब लावून खळबळ उडवून देणारा हा च तो आरोपी. पोलिसांनी नागपूर मधून या आरोपीला अटक केली. पण त्यानं हा सगळा प्रताप का केला? याचं उत्तर पोलिसांकडूनच ऐका. 10 तारीख ला त्या हॉस्पिटल ला काही पर्सनल ट्रीटमेंट साठी गेला होता जिथे त्याचे काही एस्टीमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्याने अशा प्रकारचे एक त्याने एक प्लॅन केला आणि आणि अ हे कृत्य केले असल्याचे प्रथम दर्शनी तपासात दिसते. आता हा असा प्लॅन आरोपीच्या चांगल्यात आला आणि आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. पण त्यानं हा सगळा कारनामा केला कसा? आरोपीनं अवघ्या 400 रुपयात हे बॉम्ब तयार केलं होतं यासाठी त्यानं डिजिटल वॉच, प्लास्टिक पाइप, सेलोटेप आणि काही वायरस वापरल्या होत्या. सुरुवातीला पोलिसांना हे जिवंत बॉम्ब वाटलं मात्र तपासात यात कोणतंही स्फोटक आढळून आलेलं नाही. रुग्णालयात बॉम्ब ठेवल्यानंतर आरोपी शिवाजी राठोड नागपूरला पळाला. पोलिसांनी त्याला कसं शोधून काढलं तेही ऐका. जे सीसीटीव्ही फुटेजेस वरून हॉस्पिटल मध्ये जे त्या काळात येणारे लोक आहे असे 15 ते 17 लोकांचे तपास काल दुपारपर्यंत करण्यात आला होता जोपर्यंत हे आरोपी शेवटी फायनल अ झाला नाही तोपर्यंत वेगवेगळी दिशेने तपास सुरू होता हे फायनल झाल्यानंतर त्याचे मागे टीम होती ती थोडा नी ते रेल्वे स्टेशन नी अ अराउंड 5:45 वाजता आमची एक मोठी ऑपरेशन तिथे आम्ही राबवली होती परंतु ते अ ट्रेन नी निघून गेला होता आणि शेवटी ट्रॅक करत आम्ही अ त्यांना शेवटी नागपूरला एटीएस टीम ची मदतीने पकडण्यात आलं. महत्वाचं म्हणजे या आरोपीनं बॉम्ब बनवायला 400 रुपये खर्च केले मात्र त्याला शोधायला यंत्रणेचे 4 लाख रुपये खर्ची पडले. 7 लाखांच्या खर्चासाठी आरोपीनं 400 रुपयांचा जुगाड केला खरा पण शेवटी एका ऑनलाइन पेमेंट न त्याचं भिंग फुटलं. रुग्णालय प्रशासनाला ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात असलेला हा पट्ट्या त्याच्या या प्लॅन मुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि रुग्णालयातल्या बॉम्ब प्रकरणाचा गुंता अखेर सुटला.