Pune Rain Water Logging : पुण्यात पाऊस,प्रशासन फूस्स! रस्त्यांवर पाणी, लाखोंचं नुकसान Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : पुणे जिल्ह्यात (Pune News) जोरदार पाऊस (Rain News) झाला आहे. धानोरी भागात दुपारपासून जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. धानोरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतरची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक लोकांचं दुकानदारांचा मोठं नुकसान झालं आहे. पहिल्या पावसानंतर पुण्यातील धानोरी भागात जनजीवन विस्कळीत परिस्थिती झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी भरलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. महापालिकेकडून पावसापूर्वीची कामं झाली आहेत का नाही, असा प्रश्न पुणे करांकडून विचारला जात आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
पुण्यामध्ये दुपारी काही वेळासाठी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. एवढ्या कमी वेळेसाठी पाऊस पडून एवढं पाणी साचत असेल, तर महापालिकेनं नेमकं काय काम केलं आणि मान्सूनपूर्वी काय तयारी केली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. धानोरी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं आहे. रस्त्यावर उभ्या चार चाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.