Pune Corporation Special Report: पुण्यात दोन महापालिका? काय आहे सध्याची परिस्थिती?
abp majha web team | 02 Sep 2022 10:02 PM (IST)
वाढत्या पुण्याचा कारभार पाहणं सुरळीत व्हावं यासाठी पुणे महापालिकेचं विभाजन होऊन दोन महापालिका व्हायला हव्यात असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलीय . त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीने पाठींबा दर्शवलाय तर काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केलाय . खरं तर पुणे महापालिकेचं विभाजन होऊन हडपसर ही नवीन महापालिका अस्तित्वात यावी ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सर्व पक्षीय नेत्यांकडून होतेय . मात्र त्या दिशेने प्रत्यक्षात पाऊलं मात्र पडलेली नाहीत .