Public on Kalank Special Report : ठाकरे-फडणवीसांच्या मुखातील कंलक शब्द जनतेनं कुणाला केला बहाल?
abp majha web team | 11 Jul 2023 08:51 PM (IST)
Devendra Fadanvis On Uddhav thackarey: फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती. त्याला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंना कलंकीचा काविळ झाला आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेचा (Uddhav Thackarey) समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून नागपुरातील सभेमध्ये त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती.