PUBG : गेम्सच्या आहारी जाणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा! पब्जीच्या व्यसनाने चक्क 10 लाखांवर डल्ला ABPMajha
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2021 08:29 PM (IST)
Mumbai : PUBG या ऑनलाइन गेमच्या नादात अल्पवयीन मुलाने आईच्या बँक खात्यातील दहा लाखांवर डल्ला मारल्याची घटना घडलीय. मुंबईत जोगेश्वरी पूर्व इथल्या दुर्गानगर भागात ही घटना घडली. पैसे खात्यातून काढल्याची बाब आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला चांगलाच दम भरला. यामुळे रागाच्या भरात मुलगा घर सोडून गेला. मुलगा घरी परतला नसल्याने आईवडीलांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास करत या मुलाचा शोध घेतला असता तो मुलगा अंधेरीतील महाकाली गुंफा इथं फिरताना आढळला. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलंय.