Primary School Time Special Report : प्राथमिक शाळा 9 वाजेनंतर भरणार, निर्णयामागचं कारण काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrimary School Time Special Report : प्राथमिक शाळा 9 वाजेनंतर भरणार, निर्णयामागचं कारण काय?
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी ही सूचना केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक आणि बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकरांनी सांगितलं. बदलत्या जीवनशैलीमुळं सकाळची शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळं त्यांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत राज्य सरकारनं विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी नुकतीच केली होती.