Pooja Chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव?
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2021 10:31 PM (IST)

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.