Prabhadevi : दगडावर चर्चचा उल्लेख अन् वादाची ठिणगी, राजकारणाची आग, धर्मयुद्धाचं तेल!
abp majha web team | 01 Jan 2022 08:06 PM (IST)

Mumbai : कधी काळी सात बेटांचं शहर असलेली आपली मुंबई ही पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना आंदण दिली. ब्रिटिशांनीच साधारण 19व्या शतकात मुंबई शहराचं नियोजन केलं. त्याच्या अनेक खुणा आजही ऐतिहासिक वारसा म्हणून जपण्यात येतायत. त्यापैकीच एक खूण म्हणजे मुंबईतील मैलाचे दगड. मुंबई महापालिकेनं शहरात 16-17 ठिकाणी असलेले ब्रिटिशकालीन मैलाचे दगड शोधून काढलेयत.