Powai Hostage Crisis: पवईत थरार, स्टुडिओत १७ मुलांना ओलीस; आरोपीचा एन्काऊंटर Special Report
abp majha web team | 30 Oct 2025 10:34 PM (IST)
मुंबईच्या पवई (Powai) येथील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने तब्बल १७ मुलांना ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली. आरोपीने एक व्हिडिओ जारी करून म्हटले, 'ना मै टेररिस्ट हूं ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। ...स्लाईटेस्ट रॉंग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी। की मैं ये पूरा जग को आग लगा दूं और उसमें मर जाऊं'. शालेय शिक्षण विभागाने त्याचे 'स्वच्छता मॉनिटर अभियान' (Swachhata Monitor Abhiyan) गुंडाळल्याने ४५ लाखांचे नुकसान झाल्याचा त्याचा आरोप होता, आणि याच नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी (Mumbai Police) बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आर्यने एअर गनने (Air Gun) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला आणि सर्व १९ ओलिसांची (१७ मुले आणि २ प्रौढ) सुखरूप सुटका करण्यात आली.