Poonam Mahajan Special Report : वडिलांच्या हत्येवरुन पूनम महाजन कडाडल्या
abp majha web team | 07 Nov 2022 11:44 PM (IST)

भाजपनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचं रणशिंग फुकलंय. भाजपच्या जागर मुंबईचा या प्रचार मोहिमेला रविवारी मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातून सुरुवात झाली. भाजप खासदार पूनम महाजन यांच्या एका वक्तव्यानं ही सभा गाजली. या सभेत भाषण करत असताना पूनम महाजन यांनी त्यांचे वडील प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत एक वक्तव्य केलं. तब्बल १६ वर्षांनंतर पूनम महाजन यांनी असं वक्तव्य का केलं? आणि त्याचे काय राजकीय अर्थ-अन्वयार्थ असू शकतात