Pollution in India | सावधान! देशात प्रदूषण वाढतंय; भारत जगात तिसऱ्या स्थानी Special Report
एबीपी माझा वेब टीम | 17 Mar 2021 11:51 PM (IST)

भारत हा सर्वाधिक हवाप्रदूषण असणारा जगातला तिसरा देश ठरलाय. आयक्यूएअर या स्वीस संघटनेच्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीय. या अहवालानुसार जगातल्या सर्वात जास्त ३० प्रदूषित शहरांमध्ये भारतातल्या २२ शहरांचा समावेश आहे. त्यात दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर ठरलंय.