Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही काही नवी मागणी नाही. यापूर्वी तमाम हिंदुत्ववादी पक्षांनी आणि संघटनांनी ही मागणी केलीय. मात्र आता पुन्हा एकदा सावरकरांना भारतरत्न देण्याचा विषय चर्चेत आलाय. निमित्त ठरलंय सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी त्यांच्या व्याख्यानात केलेलं एक विधान. भागवतांनी हे विधान केल्यानंतर सावरकरप्रेमी खूश झाले. मात्र विरोधकांनी या विधानाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बघूया, आज दिवसभरात नेमकं काय घडलं.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची ही तीन वाक्यं सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातही लक्षवेधी ठरलीयत.
निमित्त होतं संघाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच.
मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये केलेल्या भाषणात सरसंघचालकांनी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याविषयी ही तीन वाक्यं उच्चारली आणि सुरु झाला प्रतिक्रियांचा पाऊस.
भागवतांची मागणी योग्य असली तरी ती मांडण्याची जागा चुकल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना एक सवाल विचारला.
सलमान खान आणि अदनान सामीसह बॉलिवूडमधील अनेक तारेतारकांनी या व्याख्यानाला हजेरी लावली.
मात्र राऊतांनी सवाल उपस्थित केलाय या व्याख्यानाला आमंत्रण न मिळालेल्या सेलेब्रिटींबाबत.
All Shows


































