ED कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, अनिल देशमुखांच्या निवासस्थानावर ईडीची ठापेमारी
सरीता कौशिक, एबीपी माझा | 25 Jun 2021 11:01 PM (IST)
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. आज सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.