POK Indian Pakistan : पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार? पाकव्याप्त काश्मीरचा गुंता सुटणार कसा?

भारत-पाकिस्तान संघर्षात नेहमी चर्चेला मुद्दा येतो तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा...पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं भारताचं ठाम म्हणणं आहे...आता चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच, असं भारतानं ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला ठणकावलंय...पण पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याचा मार्ग कोणता?...पहलगाम हल्ल्यानंतर ती संधी भारताला मिळाली होती का?, आणि ती भारतानं गमावली का? पाहुयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीयांना अपेक्षा होती की आता मोदी सरकार थेट पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेईल... पण जेव्हा एचानक शस्त्रसंधी जाहीर झाली, तेव्हा लोकांना धक्का बसला... सैन्याला कशासाठी रोखलं, असा सवाल विरोधी पक्षांनीही सरकारला केला... आता महाराणा प्रताप आणि त्यांचे धाकटे बंधू शक्ती सिंह यांच्या संबंधांचं उदाहरण देत राजनाथ सिंहांनी भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमधले संबंध अधोरेखित केलेत... एके दिवशी पाकव्याप्त काश्मीरच स्वत:ला भारत असल्याचं जाहीर करेल आणि भारतात येईल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं...
राजनाथ सिंह म्हणतात त्याप्रमाणे PoK स्वत:हून भारताकडे येईल का... पीओकेमधले लोक पाकिस्तानी सरकारविरोधात बंडाची तयारी करतायत का? पीओके ताब्यात घेण्याची ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेली मोठी संधी भारतानं गमावली का?, असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत..