PM Narendra Modi Rojgar Special Report : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्र
abp majha web team | 22 Oct 2022 09:55 PM (IST)

दिवाळीच्या मुहूर्तावर आज देशातल्या 75 हजार तरुणांना नोकरीचं नियुक्तीपत्रं देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतल्या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला. आणि देशभरातल्या तब्बल 75 हजार तरुणांना नोकरीचं नियुक्तीपत्र देण्याची मोहीम सुरु करण्यात आली. केंद्र सरकारनं पुढच्या वर्षभरात 10 लाख नोकऱ्या देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. या रिपोर्टमधून केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याचा आढावा घेऊयात.