PM Speech : दोन वर्षांपूर्वीच्या स्थलांतरावरून राजकारण, उद्या महाराष्ट्रात काँग्रेसचं आंदोलन Special Report
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलीय. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असं सांगत या वक्तव्याविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. भाजपच्या सर्व कार्यालयांसमोर उद्या मोदीजी माफी मांगो, असं आंदोलन काँग्रेस करणार आहे. राज्यातले भाजप नेते पंतप्रधानांच्या वक्तव्याचं समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केलीय. तर या आंदोलनावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलीय.