PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha

बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राची... आणि मोदींच्या भेटीनंतर दूर झालेल्या अडचणीची... बऱ्याच वर्षांनी पंतप्रधान मोदींना त्यांचा शालेय मित्र भेटला... त्या मित्रानं त्याची अडचण मोदींच्या कानावर घातली...त्यानंतर वेगानं सूत्र हालली आणि ती अडचण दूर झाली.. नेमकं हे प्रकरण तरी काय आहे.. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट
नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करणारे...
आणि चेहऱ्यावर आभारप्रदर्शनाचे भाव असणारे...
हे आहेत ८१ वर्षांचे असगर अली वोरा
असगर अली वोरा हे नरेंद्र मोदींचे शालेय मित्र...
या दोन मित्रांना एकमेकांना भेटून झालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यापलिकडचा आहे...
मात्र सध्या या भेटीची चर्चा होतेय ती वेगळ्याच कारणांमुळे..
पंतप्रधान मोदींनी आपल्या मित्राला एका मोठ्या अडचणीतून बाहेर काढलंय..
आता असगर अली गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या अडचणींचा सामना करत होते?
हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल मुंबईलगतच्या मीरा-भाईंदरमध्ये
असगर अली वोरा यांच्या दाव्यानुसार त्यांनी मीरा-भाईंदरमधला हा भूखंड १९८९ मध्ये खरेदी केला होता
मात्र २०११ मध्ये या भूखंडावर अतिक्रमण झालं आणि तेव्हापासून हा भूखंड परत मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला असा असगर अली वोरा यांचा दावा आहे
पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान असगर अली वोरा यांनी हे प्रकरण कानावर घातल्यानंतर सूत्र हलली
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक झाली...
आणि सध्या ज्या सेव्हन इलेव्हन कंपनीकडे भूखंडाचा ताबा आहे, त्या कंपनीनं सगळे व्यवहार रद्द करत भूखंडावरचा हक्क आणि बांधकाम परवाना देखील परत केलाय
आता सेव्हन इलेव्हन कंपनीमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता भागीदार आहेत...
असगर अली वोरा यांच्याशी कोणताही व्यवहार झाला नसल्याचं सेव्हन इलेव्हन कंपनीच्या संचालकांचं म्हणणं आहे
मोदींपर्यंत प्रकरण गेलं म्हणून माघार घेतली का?
या प्रश्नावर भाजपचे आमदार भागीदार असलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीचं काय म्हणणं आहे तुम्हीच ऐका
तर असगर अली वोरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र नसते तर...?
जर असगर अली वोरांनी भेटीदरम्यान जमिनीचं प्रकरण पंतप्रधानांच्या कानावर घातलं नसतं तर...?
आज त्यांना त्यांचा भूखंड परत मिळाला असता का?