PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

आजपासून तुम्ही तुमची कार-बाईक बाजूला ठेवत मेट्रोचा पास काढणार?... आता घरात महिन्यातून एकदाच भजी किंवा तळणीचे पदार्थ तयार करणार?... उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फॉरेन ट्रिपचा प्लॅन रद्द करणार?.. बॉसच्या मागे लागून वर्क फ्रॉम होमसाठी हट्ट करणार?... यातील एका किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर पंतप्रधान मोदींच्या लेखी तुम्ही सच्चे देशभक्त आहात.. मात्र ही देशभक्ती सिद्ध करणं किती तुम्हाला कितपत शक्य आणि परवडणारं आहे? हाच मूळ प्रश्न आहे... अमेरिका - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केलंय... आणि त्या आवाहनाला जनतेनं स्वीकारलंय की नाकारलंय...
ज्या पद्धतीनं केंद्र सरकार जनतेकडून काटकसरीची अपेक्षा ठेवतेय...
त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता देखील सरकारकडून योग्य धोरणाची आणि त्याच्या अंमलबजावणीची अपेक्षा ठेवतेय..
यातील एकानं जरी अपेक्षाभंग केला तरी त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे..
त्याचप्रमाणे काटकसरीची अंमलबजावणी स्वतः नेत्यांनी केली तर जनता देखील त्याचं नक्कीच अनुकरण करेल