Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports

कर्नाटक सरकारनं नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारी तसंच खाजगी कार्यालयातील महिलांसाठी दर महिन्याला भर पगारी मासिक पाळी रजा मिळणार आहे. पण भारतात अगदी मोजक्या राज्यांमध्ये महिलांसाठी अशा रजेची तरतूद आहे. ती राज्य नेमकं कोणती आहेत? खरंच नोकरदार महिलांना मासिक पाळी रजेची गरज आहे का?
स्त्री ही कणखर असते...
घर, कुटुंब, ऑफीस आणि अशा कित्येक जबाबदाऱ्या
ती रोजच समर्थपणे पार पाडत असते....
तिची सहनशीलता, जबाबदाऱ्या झेलण्याची ताकद
आणि परिस्थितीला सावरुन पुढे जाण्याची वृत्ती याला कशाचीच तोड नाही...
पण प्रत्येक महिन्यात एक असा काळ येतो
ज्यावेळी तिला, तिच्या शरीराला खरंच गरज असते ती थोड्याशा विश्रांतीची....
तो म्हणजे मासिक पाळीचा काळ...
((फोटो व्हिज मोंटाज.... मासिक पाळीच्या वेदना दाखवणारे फोटो))
मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना तीव्र वेदना होतात...
काहींना तर रोजची कामं करणंही कठीण जातं...
इतकंच नाही तर काहींना वेदनाशामक औषधं घ्यावी लागतात...
पण आपल्या समाजात ही गोष्ट,
स्त्रियांना होणारा हा त्रास बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना अशा दिवसांमध्ये
कामावर लक्ष केंद्रित करणं बऱ्याचदा कठीण जातं...
म्हणूनच आता अनेक राज्यांमध्ये मासिक पाळी रजेसंदर्भात
सकारात्मक पावलं उचलली जातायत...
कर्नाटक राज्यामध्ये नुकतीच नोकरदार महिलांसाठी पीरीयड लीव्ह मंजूर करण्यात आली आहे....
कोणत्या राज्यात मिळते मासिक पाळी रजा?
-----------------------------------------------------------
-भारतात केवळ चार राज्यांमध्ये मासिक पाळी रजेचा नियम
-बिहारमध्ये १९९२ पासून महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला २ दिवस रजा
-केरळमध्ये २०२३ पासून मासिक पाळी रजा लागू
-ओडिशामध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची सशुल्क मासिक पाळी रजा
-कर्नाटकमध्ये महिन्याला एका दिवसाची मासिक पाळी रजा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे
((ग्राफिक्स आऊट))
भारतात केंद्रीय स्तरावर पीरियड लीव्हबाबत कोणताही कायदा नाही....
काही वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे असं म्हणत
मासिक पाळी रजेशी संबंधिक एका निर्णयाला विरोध केला होता...
रजेची गरज असली तरी त्याकडे समस्या म्हणून पाहिलं जाऊ नये
अशी इराणी यांची त्यावेळी भूमिका होती
२०२४ साली सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातील निर्णय राज्यांवर सोपवले...
अलीकडच्या काळात देशभरातील काही खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स
याविषयी सकारात्मक पावलं उचलाताना दिसतायत...
एक्स्पर्ट बाईट्स –
आज जगातील अनेक देशांनी महिलांचं आरोग्य केंद्रस्थानी ठेवून
मासिक पाळीसंदर्भात निर्णय घेतलेयत....
जपानमध्ये तर फार पूर्वीपासून मासिक पाळी रजेचा नियम अस्तित्वात आहे...
स्पेन आणि युरोपातील अन्य काही देशांमध्येही
महिलांना मासिक पाळीच्या दिवसात रजेची खास सवलत दिली जाते
((फोटो मोंटाज.... बाहेरच्या देशातील महिलावर्ग.. ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी))
महाराष्ट्रातल्या महिलावर्गाचं या पीरियड लीव्हबद्दल काय म्हणणं आहे, पाहूयात...
बाईट ०१ -
बाईट ०२ -
बाईट ०३ -
पीरियड लीव्ह हा फक्त रजेचा मुद्दा नाही...
तो महिलांशी संबंधित आरोग्याचा एक संवेदनशील मुद्दा आहे...
ती स्त्रीची कमजोरी नाही... तर ती तिच्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे...
या प्रक्रियेदरम्यान तिला होणाऱ्या त्रासातून थोडीशी विश्रांती मिळावी
म्हणून तिला मिळणारी साधीशी रजा ही सुविधा नाही तर हक्क म्हणून मान्य व्हावी...
सिद्धेश कानसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई...