NCP Alliance : काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? स्थानिक निवडणुकीत मोठ्या घडामोडी Special Report
abp majha web team | 12 Nov 2025 10:10 PM (IST)
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये आघाडीच्या चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, आणि जेजुरीसारख्या ठिकाणी दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळत असताना, पुण्यात मात्र शरद पवार गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. "महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत," असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षांनी केला आहे. या घडामोडींमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली असून, राज्याच्या सत्तेवर त्याचे काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.