Sharad Pawar Political Career Special Report : कशी आहे शरद पवारांची राजकीय कारकीर्द ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Political Career Special Report : कशी आहे शरद पवारांची राजकीय कारकीर्द ?
भर उन्हाळ्यात आजची दुपार उन्हाने तापली असतानाच... राजकीय तापमानही चांगलंच वाढलं... राजकारणातला मोठा भूकंप झाला... त्याचं केंद्र होतं वाय. बी. चव्हाण सेंटर... शरद गोविंद पवार... महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात पॉवरफुल नाव... देशाच्या राजकारणावर आपली छाप पाडणारे मोठे नेते... 63 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीत शरद पवारांनी अनेक धक्के परतवून लावले आणि अनेक दणकेही दिले. मात्र कारकीर्दीतला सर्वात मोठा धक्का शरद पवारांनी आज दिलाय... ज्याने महाराष्ट्रासह देशभरात राजकीय भूकंपाचे हादरे बसलेत. महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवणारा तो निर्णय म्हणजे, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याचा... हा निर्णय शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यातच जाहीर केला. कुणाच्या ध्यानीमनी नसताना पवारांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या... सभागृह काही क्षण स्तब्ध झालं... त्यानंतर काही क्षणांतच ही बातमी देशभरात गेली आणि खळबळ उडाली... शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आलेले कार्यकर्ते दु:खी झाले... अस्वस्थ झाले.