NCP organization Special Report : पटेल उपाध्यक्ष की कार्यकारी अध्यक्ष? संघटनेतील बदल घटनेत का नाही?
abp majha web team | 04 Jul 2023 11:18 PM (IST)
शिवसेनेत झाली तशीच, आता राष्ट्रवादीत उभी फूट पडलीय. शिवसेनेइतकी थरारक नसली तरी राष्ट्रवादीतली फूटही काही कमी परिणाम करणारी नाहीय... शिवसेना कुणाची या प्रश्नामागे गेली वर्षभर कायदेशीर काथ्याकूट सुरु होता... कोर्टात ती केस संपते ना संपते तोच आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न उपस्थित झालाय. पण या सगळ्या प्रश्नांचं मूळ आहे राष्ट्रवादीच्या घटनेत... जी घटना बदलू शकते महाराष्ट्राचं राजकारण... अजित पवाराचं भविष्य... आणि महत्त्वाचं म्हणजे, ज्यांनी कित्येक दशकं राजकारण केलं त्या शरद पवारांच्या कारकीर्दीचं बदलू शकतं चित्र.