घरी परत येतो असं लेकरांना सांगून गेले..पण परतलेच नाही, कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू : कोल्हापूर
विजय केसरकर, एबीपी माझा | 01 May 2021 12:30 AM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शित्तूरतर्फे मलकापूर इथले महादेव गणपती पाटील आणि त्यांची पत्नी सीमा यांचा कोरोनानं मृत्यू झाला. पोरक्या झालेल्या दोन मुलांकडे पाहून अनेकांना हुंदका आवरता येईना. महादेव हे पुण्यामध्ये एका कंपनीत मोठ्या पदावर होते. लॉकडाऊनमुळे पत्नी आणि मुलांसह ते मूळगाव असलेल्या शित्तूर तर्फे मलकापूर याठिकाणी आले. काही दिवसांपूर्वी पत्नी सीमा यांना त्रास होऊ लागला. मनात शंका नको म्हणून टेस्ट केली तर महादेव आणि सीमा या दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर पूर्वा आणि तन्मय या दोन्ही मुलांची टेस्ट निगेटिव्ह आली.