Special Report : परमबीर सिंहांचा लेटरबॉम्ब देशमुखांना पडणार महाग? CBIकडून राज्यात 10 ठिकाणी छापेमारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2021 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला. जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. 12 अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.