Param Bir Singh : परमबीर सिंह यांनी देश सोडला? अटकेची भीती?होमगार्डचे डीजी आहेत कुठे? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. दरम्यान, या प्रकरणी आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. कोणत्याही अधिराऱ्याला भारत सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांना गृहमंत्रालय शोधत आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.
अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत ते डिलिव्हर झालेलं नाही. एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयासोबत परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सरकारी अधिकारी असल्याने देशाबाहेर जाण्याआधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ते जर गेले असतील तर ती चांगली गोष्ट नाही. कोणीही मंत्री असो अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना भारत सरकारच्या परवानगीशिवाय देश सोडता येत नाही. याबाबत केंद्र सरकार काय करेल हे पाहावे लागेल. मात्र, सध्या महाराष्ट्र सरकार त्यांना शोधत आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.