Palghar Special Report : पालघरमध्ये कंपनीत राडा, 17 पोलीस जखमी, कंपनीत दोन गटात तुफान दगडफेक
abp majha web team | 08 May 2022 11:01 PM (IST)

पालघरमध्ये कंपनीत राडा, 17 पोलीस जखमी. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीमध्ये युनियन स्थापनेच्या हालचाली सुरु होत्या. पण याच मुद्यावरुन मतमतांतरं असलेल्या दोन संघटनांमधल्या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. हा वाद इतका टोकाला गेला की यात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही चक्क दगडफेकीचा सामना करावा लागला. नेमका हा वाद पेटला कसा आणि त्यानंतर काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.