✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Vinay Narwal Killed in Pahalgam Terror Attack : या अश्रूंचा हिशेब कधी? आधी धर्म विचारला मग जीव घेतला

abp majha web team   |  23 Apr 2025 11:13 PM (IST)

काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यात एका नवविवाहित दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला... हरियाणाचे लेफ्टनंट विनय आणि हिमांशी यांचं अवघ्या सात दिवसांपूर्वी लग्न झालं होतं...डोळ्यांत स्वप्नं घेऊन हनीमूनसाठी ते काश्मीरला गेले होते...पण हिमांशी यांच्या समोरच दहशतवाद्यांनी विनय यांच्यावर गोळ्या झाडल्या...पाहुयात मन हेलावून टाकणारी ही दुर्दैवी कहाणी...


कोणत्याही संवेदनशील माणसाच्या काळजाला भेगा पाडणारा हा फोटो...


हा फोटो कालपासून ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओल्या झाल्या असतील...


या फोटोची तुलना दुसऱ्या महायुद्धातल्या त्या चिमुकल्याच्या फोटोशीच होऊ शकते...


...जो आपल्या छोट्या भावाचे अंतिम संस्कार करण्यासाठी त्याला पाठीशी बांधून स्तब्धपणे स्मशानभूमीत वाट पाहत उभा आहे...


किंवा जगभरातल्या लोकांचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन वर्षांच्या त्या आलन कुर्दीशी...


...जो २०१५ मध्ये दंगलग्रस्त सिरीयातून युरोपात आयुष्य सावरण्यासाठी निघालेल्या आईवडिलांसोबत जात असताना भूमध्य सागरातच त्याच्या आयुष्याचा प्रवास थांबला...


समुद्रकिनारी निपचित पहुडलेल्या त्याच्या फोटोनं जगभरातल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता...


पृथ्वीवरचं स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधल्या पहलगाममधला आताचा हा असाच मन सुन्न करणारा फोटो...


तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंगही अजून उतरला नव्हता


गेल्याच आठवड्यात तिनं आपल्या जोडीदारासोबत साता जन्माच्या गाठी मारल्या होत्या...


आणि केवळ सातच दिवसांत त्याच जोडीदाराच्या पार्थिवाशेजारी बसून आकांत करण्याची वेळ तिच्यावर आली...


ज्या डोळ्यांनी नव्या आयुष्याची स्वप्नं बघितली, त्याच डोळ्यांमधले अश्रू आता थांबायला तयार नाहीत...


दोनच दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते...


मंगळवारी पहलगाममधल्या बैसरन खोऱ्यात ते फिरायला गेले...


आणि माणसाचा मुखवटा घालून आलेल्या सैतानांनी त्यांच्यावर घाला घातला...


हिमांशी हिच्या डोळ्यांसमोरच अतिरेक्यांनी विनय यांना घेरलं...


भेळपुरी खात असलेल्या विनयला अतिरेक्यांनी धर्म विचारला आणि निर्दयतेने गोळ्या घातल्या...




  • हरियाणातल्या कर्नालचे लेफ्टनंट विनय नरवाल तीन वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते.

  • अवघ्या सात दिवसांपूर्वी त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग मसुरीत झालं होतं.

  • आठच दिवसांत म्हणजे एक मे रोजी विनय यांचा वाढदिवस होता.

  • ३ मे रोजी ते कोचीमध्ये ड्युटीवर हजर होणार होते.


पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं...


आपल्या कर्तबगार मुलाच्या जाण्यानं नरवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय...


खरं तर विनय आणि हिमांशी हनिमूनसाठी युरोपला जाणार होते...


पण व्हिसा न मिळाल्यानं ऐनवेळी त्यांनी काश्मीरचा प्लॅन आखला...


आणि स्वप्नवत काश्मीरमध्ये जोडीदारासोबत नव्या संसाराची स्वप्नं रेखाटताना सगळंच विस्कटलं...


अवघ्या सात दिवसांत होत्याचं नव्हतं झालं...आयुष्याची राखरांगोळी झाली...


ही राखरांगोळी करणारे नराधम मोकाट आहेत...त्यांना कायमची अद्दल घडवणं


हीच लेफ्टनंट विनय यांना खरी श्रद्धांजली असेल...


ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Vinay Narwal Killed in Pahalgam Terror Attack : या अश्रूंचा हिशेब कधी? आधी धर्म विचारला मग जीव घेतला

TRENDING VIDEOS

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल12 Hour ago

Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका16 Hour ago

Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली16 Hour ago

Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या20 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.