दीपक फर्टिलायझर कंपनीकडून राज्यात 6 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट,शनी शिंगणापूर देवस्थान रुग्णालयातही प्लांट
नितीन ओझा, एबीपी माझा | 05 Aug 2021 08:42 PM (IST)
कोरोना काळात आलेल्या संकटानंतर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले आणि यानंतर प्रशासनाने ठिकठिकाणी ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र सरकारच्या या प्रयत्नांना अनेक सामाजिक संस्था सोबत अनेक उद्योग व्यावसायिकांनी सुद्धा साथ दिली असून शनी शिंगणापूर येथील देवस्थानच्या रुग्णालयात महाधनच्या वतीनं ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा दान स्वरूपात दिलीय.