Osmanabad : राजकारणाला ऊत; शेतात पडून ऊस, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत ABP Majha
abp majha web team | 21 Feb 2022 07:16 PM (IST)

गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकारणाला ऊत आलाय... रोज कुणी तरी उठणार आरोप करणार मग त्याच्यावर प्रतिआरोपप होणार... हीच चिखलफेक सुरु आहे... पण ज्याच्या मतावर निवडून आले आहेत... तो शेतकरी मात्र या आरोपप्रत्यारोपाच्या लढाईत एकटा पडलाय... १६ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला तरीही शेतकऱ्याचा ऊस गाळपाला गेलेला नाही... अतिरिक्त ऊसाचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय... पण याच्याकडे आरोपप्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांचं मात्र लक्ष नाही... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.