Osmanabad Farming : पेरणीतील नवा प्रयोग क्रांतीकारक ठरणार, BBF Technology शेतकऱ्यांसाठी वरदान
abp majha web team | 17 Aug 2022 02:49 PM (IST)

अतीपाऊस किंवा कमी पाऊस यामुळे पीके कोमेजून जातात. यावर रुंद सरीच्या वाफ्यावर पीक टोकन करण्याची पध्द्त कमालीची फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. अशा पावसातही वाफ्यावर लागवड केलेल्या सोयाबीनचे कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. पीकांची वाढ जोमदार आहे. आमचे प्रतिनिधी सुध्दा या तंत्रज्ञानाचा सलग तिसर्या हंगामात वापर केला आहे.