Saibaba Temple CISF Special Report : साई मंदिरात साआयएसएफ नियु्क्तीला विरोध
abp majha web team | 27 Apr 2023 10:59 PM (IST)
कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचं अनेकदा समोर आलं. त्यानंतर मंदिराला दुहेरी सुरक्षा पुरवण्यात आली. पण सुरक्षेच्या प्रश्नावरुन माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळेंनी २०१८ साली मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं सीआयएसएफच्या सुरक्षाव्यवस्था नेमणुकीचा विचार केला. त्यावर साई संस्थानकडून कोर्टामध्ये सकारात्मक अहवाल देण्यात आल्याचं समजताच शिर्डीचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. साई मंदिर आणि परिसरात सीआयएसफची सुरक्षाव्यवस्था नियुक्त करण्यास शिर्डीकर ग्रामस्थांचा विरोध आहे. सीआयएसएफच्या सुरक्षाव्यवस्थेचा भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होईल, असा दावा त्यांनी केला आहे.