एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर लिक्विडने शेतकऱ्यांचं काम होणार, IFFCO कडून नॅनो युरियाची निर्मिती
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
01 Jun 2021 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : इंडियन फार्मर्स फर्टिलायजर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने (IFFCO) जगात पहिल्यांदाच नॅनो युरिया लिक्विड तयार केलं आहे. यामुळे पिकांचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. आता एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे.
इफ्कोची ऑनलाईन-ऑफलाईन झालेल्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. जमिनीत युरियाचा वापर कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाने प्रेरित होत हे लिक्विड तयार करण्यात आलं आहे.