भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसेंच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख, हा तांत्रिक घोळ की कारस्थान?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2021 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.