Night Curfew | पार्टी 'नही' होगी टिल 6 इन द मॉर्निंग,महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2020 12:59 AM (IST)

मुंबई : ट्विटरवर जर सगळ्यात सक्रिय पोलीस असतील तर ते मुंबई पोलीस आहेत. ते नेहमी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चर्चा होत असते. आताही मुंबई पोलीसांनी ट्वीट करत पार्टी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल होत असतात.