मालवणीतील इमारत दुर्घटनेत एकाच घरातील 9 जणांचा मृत्यू, डोक्यावरचं छप्पर गेलं, घरातली माणसं गमावली...
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा | 10 Jun 2021 11:48 PM (IST)
Malad Building Collapse : मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 17 जण गंभीर जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास 16 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं.