नियुक्तीसाठी नव्यानं मेरिट लिस्ट? मेगाभरतीसाठी नवे उपाय? 2125 उमेदवांरांना EWSमधून नियुक्ती?
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2020 11:02 PM (IST)

पुणे : EWS चा जीआर काढून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी यावेळी या नेत्यांनी केली. पुण्यातील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर उपस्थित होते.