NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

महत्त्वाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकाराला थारा नको म्हणून NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी जन्माला घालण्यात आली... मात्र या NTAनं घोळ घालण्याचा सिलसिला सुरूच ठेवलाय.. आधी नीटच्या परीक्षेचं मातेरं केलं... आणि आता नेटच्या परीक्षेत माती खाल्लीय.. प्रश्नपत्रिकांमधल्या घोळांमुळे नेटच्या तीन विषयांची फेरपरीक्षा होणार आहे.. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा अनावर झालाय... पाहुयात NTAनं नेमका काय घोळ घातलाय तो..
नीट परीक्षेचे पेपर फुटले...
लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा फेरपरीक्षा द्यावी लागली...
कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीत धडक देत आंदोलन केलं...
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला...
पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल करण्यासाठी विरोधकांना आयतं कोलित मिळालं...
हे सगळं झालं ते NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अपयशामुळे... आणि त्याच NTA च्या ढिसाळ कारभारमुळे आता तीन विषयाच्या NETची फेरपरीक्षा घेण्याची वेळ ओढवलीय... त्यामुळे संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरले
NTA परत 'नापास', पुन्हा फेरपरीक्षेचा त्रास - HEADER
२२ ते ३० जूनदरम्यान UGC-NETची ८७ विषयांची परीक्षा झाली होती...
त्यापैकी इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांची फेरपरीक्षा होणार आहे...
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्न दोनवेळा विचारण्यात आले होते...
समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखन, प्रिटिंग आणि भाषेसंबंधी चुका आढळून आल्या होत्या...
९ सप्टेंबरला सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० पर्यंत इंग्रजी विषयाची...