Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात गेलाय... अद्याप चार हजार नागरिक बेपत्ता असून आता बरेच दिवस उलटून गेल्यामुळे चिंता वाढलीये... महापुरात नेपाळची गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली असून सगळीकडे केवळ चिखलाचं साम्राज्य दिसतंय... पूरग्रस्त नेपाळमधून एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट बघुयात...
नुवाकोट, नेपाळ | 26 ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक आलेल्या पुरात (फ्लॅश फ्लड) बचावलेल्या हिरव्या रंगाच्या घराच्या मालक लक्ष्मी पांडे बाईट -
“आम्ही बचावलो, हे आमचे भाग्य आहे. आमच्यासाठी हा दुसरा जन्मच आहे, असे वाटते. पुराचे पाणी माझ्या घरात शिरल्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावर गेलो होतो. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळीही आम्हाला अतिशय तीव्र धक्के जाणवले होते आणि जवळची घरे कोसळली होती. आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला बाहेर काढून आमचे प्राण वाचवले.
नेपाळमधील रसुवामध्ये आलेल्या भीषण पुरानंतर मलब्याखाली अडकलेल्या चिमुकलीची तब्बल 72 तासांनंतर म्हणजेच 3 दिवसानंतर सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना मलब्याखालून मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते.))
-------