NCP Women's Strike Special Report : सत्तारांच्या सुप्रिया सुळेंवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात मोर्चा
abp majha web team | 15 Nov 2022 09:19 PM (IST)

NCP Women's Strike Special Report : मुंबईत अब्दुल सत्तारांविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्या. राष्ट्रवादीच्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातून महिलांचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने निघाला होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.