✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

abp majha web team  |  15 Jul 2026 11:26 PM (IST)
ABP News

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगानं घडामोडी घडू लागल्यात... सध्या सर्वाधिक बातम्या येतायत त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून... काल रात्री पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे दोन बडे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेदेखील 'वर्षा'वरच होते, असं सांगितलं जातंय... मुख्यमंत्र्यांची भेट ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाबाबत झाल्याचं पाटील यांनी जाहीर केलंय... यावर आलेल्या प्रतिक्रियांमधली 'बिटविन द लाईन' ऐकल्यावर काहीतरी शिजत असल्याची शंका कुणालाही येईल... 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मंगळवारी रात्री साडेदहा वाजता 'वर्षा' बंगल्यावर गेले... 


राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेदेखील तिथं हजर होते म्हणे... 


सूत्रांच्या माहितीनुसार आधी मुख्यमंत्र्यांची पटेल, तटकरेंसोबत चर्चा झाली... 


आणि त्यानंतर चौघांनी जवळजवळ पाऊण तास खबलतं केली... 


दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचीही बैठक झाल्याचं सांगितलं जातंय... 


या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष चर्चेत आलेत... 


स्वतः जयंत पाटील यांनी मात्र ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दिलंय... 


यावेळी पटेल आणि तटकरेंशी भेट झाल्याचं वृत्तही जयंत पाटलांनी फेटाळून लावलं... 


ठाकरेंचे सहा खासदार फुटण्यापूर्वी संपूर्ण मौन बाळगणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी... 


आता जयंत पाटील ईश्वरपूरच्या मुद्द्यावर आपल्यालाही भेटले होते, असं सांगत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय...


तर योग्य वेळी तुम्हाला काय आहे ते समजेल, असं सांगत पंकजा मुंडेंनी गूढ अधिकच वाढवलं... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.