NCP Election Special report : आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आपली रणनीती आखायला सुरूवात
abp majha web team | 18 May 2023 11:52 PM (IST)

लोकसभेच्या निवडणूका जेमतेम दहा महिन्यांवर आहेत , तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दीडेक वर्षाच्या आत होतील.. या दोन्ही महत्वाच्या निवडणूकांमध्ये कधी ना कधी, राज्यभरात तुंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील... इतक्या कमी कालावधीत होणाऱ्या या सगळ्या महत्वाच्या निवडणूकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय... राष्ट्रवादी काँग्रेसने आपली रणनीती आखायला सुरूवात केलीय आणि नेत्यांना आदेशही दिलेत..