NCP Alliance Talks : राष्ट्रवादी दोन एकीचा टोन, राजकीय घटस्फोटानंतर पुन्हा 'बोलणी' Special Report
abp majha web team | 11 Nov 2025 10:14 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची नांदी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये (Chandgad) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, या आघाडीची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'आदरणीय पवारांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल, तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या त्या जिल्ह्यातील प्रमुखांना दिलेला आहे,' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. याउलट, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत सर्व शक्यता खुल्या ठेवल्या आहेत.